शेतकरी बंधूंना अॅग्रोस्टार तर्फे मानाचा मुजरा,

अतिवृष्टीमुळे खरीपाच्या सर्वच पिकांचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले सर्वत्र पहावयास मिळते. शेतीपिकांची झालीली हानी इतकी प्रचंड आहे की कुठल्याही भरपाईच्या माध्यमातून भरून निघणार नाही. पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांवर नसून त्यांच्या स्वप्नावर फिरले गेल्यामुळे साहजिकच कुणालाही घास गोड लागणार नाही.

 

आधीच असलेले कोव्हीड चे संकट आणि त्यात भरीस भर म्हणून झालेला निसर्गाचा प्रकोप हे म्हणजे अडथळ्यांची शर्यतच म्हणावी लागेल.  

आपल्यावर आलेल्या अशा संकटांचा सामना करण्यासाठी आपण एकत्र मिळून लढा देऊ व येणाऱ्या कालावधी मध्ये न खचता न हारता एक आदर्श पिक व शेती उभी करू. आपल्या प्रत्तेक सुखदुखःत अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टर आपल्या सोबत असणारच परंतु यावेळी भविष्यातील वाटचालींसाठी अधिक सक्षम आणि योग्य निर्णयांसाठी आम्ही आपल्या सेवेत सदैव हजर आहोत. 🙏