top of page

रेफरल नियम व अटी

 • ‘अ‍ॅग्रोस्टार रेफरल प्रोग्राम’ आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना ‘अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप’ शी जोडून अ‍ॅग्रोस्टार पॉईंटच्या स्वरूपात बक्षिसे जिंकण्याची संधी देतो.

 • कृपया लक्ष द्या, आम्ही रेफरी म्हणजेच शेतकरी A  व रेफरर म्हणजेच शेतकरी B बद्दल पुढे सांगणार आहोत.

 • रेफरी म्हणजेच शेतकरी A चा अर्थ – ज्या शेतकरीने रेफर केले आहे म्हणजे तुम्ही स्वत:

 • रेफरर म्हणजेच शेतकरी B चा अर्थ - ज्या शेतकरीला तुम्ही रेफर केले आहे म्हणजे आपला मित्र.

 • 1 अ‍ॅग्रोस्टार पॉईंट INR 1 च्या समान आहे.

 

 1. रेफरी/शेतकरी मित्र B चे फायदे: जो शेतकरी रेफरल कोडचा उपयोग करुन अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर आपल्या स्वता:ची प्रोफाईल तयार करतो, त्यावेळी त्यांना 100 अ‍ॅग्रोस्टार पॉईंट्स प्राप्त होतात. या पांइट्सचा उपयोग शेतकरी ‘अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप’वरून कृषी उत्पादने खरेदीसाठी या ऑर्डर करण्यासाठी करू शकतात.

 2. शेतकरी A साठी: जेव्हा आपले मित्र अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपमध्ये सामील होतात, तेव्हा आपल्याला 25 अ‍ॅगस्ट्रार पॉईंट्स मिळतील. आणि जेव्हा आपले मित्र अ‍ॅप वरून यशस्वी खरेदी करतात, तेव्हा आपल्याला 125 अ‍ॅग्रोस्टार पॉइंट्स मिळतील.

 

एक यशस्वी ऑर्डर म्हणजे काय?

यशस्वी ऑर्डर म्हणजे जेव्हा कोणताही शेतकरी अ‍ॅपवर ऑर्डर देतो आणि ती ऑर्डर यशस्वीरीत्या डिलिव्हर होते.     

 

रेफरलसाठी कसे पात्र ठरविले जाईल?

1. जर रेफरी/ शेतकरी मित्र B हा नवीन फोनवरून ‘अ‍ॅग्रोस्टार’ अ‍ॅप इंस्टॉल करून अ‍ॅपवर पहिल्यांदा अकाउंट बनवितो, त्यावेळी तो रेफरल पात्र ठरविला जाईल.

2. जर कोणताही शेतकरी ‘अ‍ॅग्रोस्टार’ अ‍ॅप अनइंस्टॉल करतो किवा मोबाईलमधून काढून टाकतो आणि तो पुन्हा इंस्टॉल किवा डाउनलोड करतो, तर तो रेफरल कोडच्या उपयोगसाठी पात्र ठरविला जाणार नाही.

3. जर कोणताही शेतकरी एक नवीन मोबाईलमध्ये अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप इंस्टॉल करतो, मात्र तो पूर्वीचाच नंबर अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर रजिस्टर करतो, जो आधीपासूनच आमच्या अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर रजिस्टर असेल, तर तो  रेफरलसाठी पात्र ठरविला जाणार नाही.

 

मी माझ्या शेतकरी मित्रांना कसे आमंत्रित करू?

आपण आपल्या शेतकरी मित्रांना आमंत्रित करण्यासाठी, आपल्या अ‍ॅग्रोस्टार प्रोफाईल किवा ‘आय डी’ ने ‘आपल्या मित्रांना जोडा’ बटणावर क्लिक करा किवा आपली रेफरल लिंक व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर माध्यमांवर शेयर करा.

मी इतर राज्यातून शेतकरी मित्रांना आमंत्रित करू शकतो?

होय. मात्र आमच्या सेवांच्या उपलब्धतेनुसार, आम्ही आपली किंवा आपल्या मित्रांची सेवा करू शकतो.

शेतकरी मित्र ‘B’ आणि शेतकरी ‘A’ हे दोघेही इतर राज्यातील असेल व दोन्ही राज्य अ‍ॅग्रोस्टारद्वारे सेवा किवा योजनेसाठी सक्षम असेल, तर ‘A’ शेतकरी असलेल्या राज्यातील रेफरल धोरणानुसार बक्षिसे दिले जाईल.

 

मला माझे बक्षीस कधी मिळेल?

 1. जेव्हा शेतकरी B अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर आपले अकाउंट यशस्वीरीत्या तयार करतो, तेव्हा शेतकरी A ला म्हणजे तुम्हाला रेफरल योजनेअंतर्गत आकर्षक बक्षिस किवा अ‍ॅग्रोस्टार पांइटस् दिले जाईल.

 2. आपण सामायिक केलेल्या अ‍ॅप दुव्याद्वारे आपला मित्र (शेतकरी बी) अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपशी कनेक्ट होईल तेव्हा आपल्याला (शेतकरी ए) 25 अ‍ॅग्रोस्टार पॉईंट्स मिळतील. आणि जेव्हा तुमचा मित्र अ‍ॅपमधून यशस्वी ऑर्डर करतो तेव्हा 125 अ‍ॅग्रोस्टार पॉइंट्स आढळतील.

 

मी किती शेतकरी मित्रांना आमंत्रित करू शकतो?

आपण कितीही मित्रांना आमंत्रित करू शकता. परंतु आपण केवळ 10 मित्रांसाठी पुरस्कार मिळवा.

10 पेक्षा जास्त मित्र अ‍ॅग्रोस्टारमध्ये सामील झाले तर काय होईल?

1. आपण केवळ 10 मित्रांसाठी पुरस्कार मिळवू शकता. आपला 10 वा मित्र अ‍ॅग्रोस्टारमध्ये यशस्वीरित्या सामील झाल्यानंतर आपल्या प्रोफाइलमध्ये पुरस्कार जोडले जाणार नाहीत.
2. परंतु आपल्या संदर्भात सामील होणारे आपल्या सर्व मित्रांना अ‍ॅग्रोस्टारमध्ये सामील होण्यासाठी निश्चित बक्षीस मिळेल.

 


मला रेफरल कोडची आवश्यकता आहे?

आपल्याला रेफरल कोडची आवश्यकता नाही. जर आपण अ‍ॅप इंस्टॉल किवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या लिंकचा उपयोग कराल, तर आम्ही आपल्याला आपले शेतकरी मित्र B जोडू शकतो.

सुनिश्चित करा,आपले शेतकरी मित्र आपल्या रेफरल कोडचा वापर करत आहे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी; आपण बक्षिसासाठी तेव्हाच पात्र असाल.

 

 

माझ्या बक्षिसाची वैधता काय आहे?

 1. रेफरी/शेतकरी B साठी – शेतकरी B म्हणजे ज्या शेतकरी मित्राला जोडले आहे, त्यांनी अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर 30 दिवसांमध्ये अ‍ॅग्रोस्टार पॉईंटचा वापर करणे आवश्यक आहे. नाही, पांइट्स समाप्त होतील.

 2. A शेतकरीसाठी- A शेतकऱ्याचे पाइंट त्याच्या अ‍ॅप वॉलेटमध्ये जमा झाल्यानंतर, त्याच्याजवळ रेफरलद्वारे मिळवलेले अ‍ॅग्रोस्टार पॉईंट वापरण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी असेल. 45 दिवसानंतर हे पांइट्स समाप्त होतील.

 

अ‍ॅग्रोस्टार पॉइंट्स दुसऱ्या कोणाला देता येतात का?

अ‍ॅग्रोस्टार पॉइंट्स कोणत्याही प्रकारे कोणाला ही देता येत नाहीत. कित्येक खात्यामध्ये प्राप्त झालेले अ‍ॅग्रोस्टार पॉइंट्स कोणत्याही परिस्थितीत एका खात्यात किवा अनेक खात्यात टाकता येत नाहीत.

 

 

अन्य नियम व अटी:

 1. अ‍ॅग्रोस्टार कोणत्याही सूचनेशिवाय, कोणत्याही वेळी या रेफरल पॉलिसीच्या अटी व नियम निलंबित किंवा संपुष्टात आणू किंवा बदलू शकतो.

 2. A शेतकरी व B शेतकरी मित्र या दोघांसाठीची बक्षिसांची माहिती व रक्कम कधीही बदलू शकतो.

 3. अ‍ॅग्रोस्टारजवळ खाती निलंबित करण्याचा अधिकार आहे. जर एखादे खात्याविषयी शंका वाटल्यास, ते खाते काढून टाकण्याचा अधिकारदेखील आहे.

 

नियम व अटीसाठी अपडेट:                          

अ‍ॅग्रोस्टार कोणत्याही सूचनेशिवाय अटी व नियमांमध्ये बदल करू शकतात. A शेतकरी व B शेतकरी यांना कंपनीविरूद्ध कोणत्याही बक्षिसाचा दावा करण्याचा कोणताही अधिकार नाही. या पानावर नवीन नियम व अटी जाणून घेण्यासाठी बदल केला जाऊ शकतो.

bottom of page